Breaking News

काश्मीरमध्ये बस अपघातात 22 ठार

श्रीनगर, दि, 21 - जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात प्रवासी बसला झालेल्या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही बस रियासी येथून बकाल येथे जात असताना खड्ड्यात पडून हा अपघात झाला. या बसमध्ये 45 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने हवाई मार्गाने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ताहीर साजद भट यांनी दिली. घटनास्थळी पोलीस व प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून  बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.