अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंड विजयी
दिल्ली, दि. 21 - दुसर्या एकदिवसीय सामन्यात आज न्यूझीलंडने भारतावर 6 धावांनी विजय मिळवला. हार्दिक पंड्या (36) आणि उमेश यादव (नाबाद 18) या जोडीने नवव्या विकेटसाठी 49 धावांची केलेली भागीदारी सामना जिंकण्यासाठी पुरेशी ठरली नाही. 243 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केवळ 236 धावाच करता आल्या. केदार जाधवने सर्वाधिक 41 धावा केल्या तर कर्णधार धोनीने 39 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भारताला सामना गमवावा लागला. साउदीने 3, बोल्ट आणि गप्टीलने प्रत्येकी 2 तर हेन्री व सँटनरने 1-1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. कर्णधार केन विल्यमसनच्या शतकी खेळीमुळे (118) न्यूझीलंडला दोनशेपार धावसंख्या गाठता आली. टॉम लॅथमने 46 धावा करून धावसंख्येला हातभार लावला. विल्यमसन आणि टॉम लॅथम जोडीने 120 धावांची भागीदारी केली. या व्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि न्यूझीलंडचा डाव 9 बाद 242 धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमरा आणि अमित मिश्राने प्रत्येकी तीन, तर उमेश यादव, अक्षर पटेल आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.