Breaking News

2012 ऑलिम्पिक : योगेश्‍वर दत्तच्या पदरी रौप्य नाही कांस्यपदकच

मुंबई, दि. 26 - पैलवान योगेश्‍वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळालेले कांस्यपदक रौप्यपदकात अपग्रेड होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. रशियाचा दिवंगत कुस्तीपटू बेसिक खुदाखोव प्रकरणी चौकशी थांबवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला आहे. त्यामुळे योगेश्‍वरला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागणार आहे.
2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्‍वर दत्तला पुरुषांच्या 60 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळाले होते, तर रशियाच्या बेसिक खुदोखोजला  रौप्यपदक मिळाले. 2013 साली एका कार अपघातात खुदोखोजचा मृत्यू झाला.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला.  त्यामुळे त्याचे रौप्यपदक योगेश्‍वर दत्तला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मात्र या प्रकरणी चौकशी थांबवण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यामुळे बेसिकचे रौप्यपदक त्याच्या नावेच राहील.