भारताचा पराक्रम, हॉकी अंडर 18 आशिया चषक पटकावला
ढाका, दि. 01 - भारताच्या युवा हॉकीपटूंनी अंडर 18 आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत यजमान बांगलादेशवरच मात केली.
भारताने हा सामना 5-4 असा जिंकला आणि चौथ्यांदा अंडर 18 आशिया चषक जिंकला. त्याआधी उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानला हरवले होते. भारताने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमणे केली. त्यामुळे बांगलादेशचा संघ या आक्रमणांना तोंड देऊ शकला नाही. त्यामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला.