Breaking News

हिंसाचाराप्रकरणी 117 जणांना अटक, सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे

नाशिक, दि. 14 - तळेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात उफाळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 117 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलिमहानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
नाशिक शहर आणि ग्रामीण मिळून 53 गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनचाही समावेश आहे. तसेच हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे 2 कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असेही विनयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.