Breaking News

पिचडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आय. एस. ओ. मानांकन

अहमदनगर, दि. 24 - तालुक्यातील पिचडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आय. एस. ओ.  मानांकन प्राप्त झाले असून याबद्दल सर्व शिक्षक वृदांचा  ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.
पिचडगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शनिवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भीमराज बनसोडे हे होते, तर जिल्हा  परिषदेचे माजी सदस्य दिलीपराव सरोदे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत कामटे, उपसरपंच विजया शेजूळ, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत टिळेकर, लक्ष्मण पेहरे, दत्तात्रय  हजारे,  भाऊसाहेब शेजूळ, अंबादास गव्हाणे, पोलीस पाटील सुभाष शेजूळ, गोरखभाऊ गव्हाणे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे  शाळेचे मुख्याध्यापक संतोष मगर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक शशिकांत मोरे यांनी शाळेने राबविलेल्या उपक्रमाची महिती दिली. यावेळी  गावकर्‍यांच्या वतीने सर्व शिक्षक वृंदांचा गौरव करण्यात आला.  
पिचडगावला आय. एस. ओ. मानांकन मिळाल्याने गावाची मान जिल्हा व राज्यात उंचावली असल्याचे गौरोवोदगार माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे  यांनी काढले. तसेच पालक व पाल्य यांच्यातील सुसंवाद कायम रहाण्यासाठी पालकांनी देखील पाल्याकडे लक्ष देऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावा असे  आवाहन केले. शाळेची गुणवत्ता कायम राहण्यासाठी गावकर्‍यांच्या वतीने शाळेला नेहमी सहकार्य व पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत  कामटे यांनी यावेळी बोलतांना दिली. यावेळी पिचडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या अध्यापिका श्रीमती संध्या गवळी, श्रीमती संगीता पारखे, अध्यापक दत्तात्रय  घुले यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.