Breaking News

आता सार्वजनिक ठिकाणीही मोफत वायफाय, गूगलचं भारतीयांना गिफ्ट

नवी दिल्ली, दि. 28 -भारतात जास्तीत जास्त इंटरनेट वापरता यावं यासाठी गूगलकडून ‘गूगल स्टेशन’ लाँच करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वायफाय सुविधा आणि अन्य काही खास फीचर्स गूगलने भारतात लाँच केले आहेत. गूगलने काल 18 वर्ष पूर्ण केले, त्यामुळे गूगलने भारतीयांना बर्थ डेचे रिटर्न गिफ्ट दिले आहे.
गूगलने ‘गूगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत गूगल स्टेशन, ऑफलाईन यूट्यूब पाहण्यासाठी यूट्यूब गो या सेवा लाँच केल्या आहेत. मॉल, महाविद्यालये, बस स्टॉप, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी गूगलकडून वायफाय हॉटस्पॉट बसवण्यात येणार आहेत. शिवाय गूगल असिस्टंट या वर्षापर्यंत हिंदीमध्ये उपलब्ध होणार आहे.
गूगलने अ‍ॅलो, ड्यूओ, क्रोम आणि यूट्यूब यांच्या नव्या फीचर्सचीही घोषणा केली आहे. भारतात प्रत्येक सेकंदाला तीन जण ऑनलाईन येतात. त्यामुळे कनेक्टीव्हीटी मजबूत करण्यासाठी आणि इंटरनेट सेवा सुलभ करण्यासाठी गूगल येत्या काळात प्रयत्न करणार आहे, असं गूगलचे अधिकारी सीझर सेनगुप्ता यांनी सांगितलं. गूगलकडून सध्या जगभरातील 100 पेक्षा अधिक भाषांचं भाषांतर केले जाते. यापैकी 12 भाषा केवळ भारताच्या आहेत, अशी माहिती गूगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन गियान्नड्रेया यांनी दिली.