Breaking News

फर्टिलायझर्स सीडस असोसिएशनची सभा संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी) । 28 - अहमदनगर जिल्हा फर्टिलायझर्स सीडस अ‍ॅण्ड पेस्टीसाईटस असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष सुनिल उर्फ सतीश मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली अंकुर लॉन येथे संपन्न झालेल्या या वार्षिक सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोपर्डी घटनेतील पिडीत मुलगी, उरी येथील शहिद जवान तसेच थोर नेते, महात्म्ये, संत, संस्थेच्या संबंधीत दिवंगत विभुती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेक्रेटरी दिलीप कोकणे यांनी आर्थिक वर्षाचे ताळेबंद- नफा तोटा पत्रक सादर केले तर खजिनदार रमेश खिलारी यांनी यंदाच्या वर्षाच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले.  या सभेकरीता बीड जिल्ह्याचे अध्यक्ष सत्तुजी कासट व राज्याचेफर्टिलायझर संघटनेचे अध्यक्ष प्रकाशराव कवडे उपस्थित होते. या सभेमध्ये केंद्र शासनाने कृषी विक्रेत्यांकरिता लागू गेलेल्या बीएससी अ‍ॅग्री या जाचक अटी विषयी उहापोह करण्यात आला. याच्या विरोधात प्रत्येक जिल्हा संघटनेला बरोबर घेऊन राज्य संघटना व राष्ट्रीय संघटनेच्या मदतीने दिल्ली दरबारात व हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल करण्याचे ठरले. यासाठी माफदाचे अध्यक्ष प्रकाशराव कवडे यांनी पुढाकार घेतला आहे.
या कार्यक्रमात संस्थेचे सदस्य मनोज गुगळे यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे राज्याचे माजी अध्यक्ष संजय बोरा यांनीही समयोसूचित भाषण करुन सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. अजय बोरा यांनी आभार मानले.