पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
। उपाध्याय भवन, सावेडी येथे भाजपा उपनगर शहर मंडलातर्फे अभिवादन । प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगपती पटेल यांची उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी) । 28 - देशाची अखंडता राखण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी बलिदान दिले, असे प्रतिपादन नरेंद्र कुलकर्णी यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या तैलचित्रास उपाध्याय भवन, सावेडी येथे भाजपा उपनगर शहर मंडलातर्फे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती प्रविण पटेल होते.पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, आपल्या सर्व भाजपाच्या कार्यकर्त्यांना पंडित दीनदयाळांचा वारसा आहे, त्यामुळे आपण सर्व जणांनी व्यवहार स्वच्छ करुन सावेडी उपनगर मंडलात एक पारदश्री आरसा निर्माण करुन एक चांगली जनसेवा करावी. तसेच पंडितजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब गायकवाड म्हणाले, समाजातील दीनदुबळ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरीबांचे कल्याण वर्ष साजरे करण्यासाठी सावेडी उपनगर भाजपा मंडळ सर्वतोपरी प्रर्यंकरणार आहे. एक प्रखर देशभक्त, देशातील विख्यात लेखक म्हणून ज्यांना गणले जाते, सत्तेचा काडीमात्र मोह नसणारे असे एक निर्मोही नेता, स्वत:च्या सिद्धांतावर ठाम असणारे, मन, वचन आणि कर्मासाठी त्यांनी स्वत:चे पूर्ण जीवन अर्पण केलं. अशा एका व्यक्तीमत्वाबद्दल ज्यांनी वेळ आल्यावर देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असे देशभक्त म्हणजे पंडितजी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस मुकुल गंधे यांनी केले. कार्यक्रमास विलास सांगळे, सुमित बटुळे, बाबासाहेब दळवी, दत्तात्रय शेलार, भरत पटेल, वैभव झोटींग, अशोक गायकवाड, संपत नलवडे, अशोक जगताप, धीरज मेट्ट, तेजस पटेल, आशिष पटेल, बिपीन पटेल, मिहीर ढसाळ, आदेश कर्नावट, अमित गांधी उपस्थित होते.