शिवसेना ः ‘सामना’तील समाजकंटक नक्की कोण?
मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 28 - शिवसेनेचे मुखपत्र दै.सामनाने प्रसिद्ध केलेले ते व्यंगचित्र कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरले आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत यांना विद्वतेवर असलेला फाजील विश्वासच या घटनेला कारणीभूत ठरला. आधी शिवसेना व आता सामनाच्या मुळावर ही विद्वत्ता घसरली आहे.
मराठा समाजाविषयी त्या व्यंग चित्रातून केलेले भाष्य व शहिद जवानाचा केलेला अवमान क्षमापात्र नाहीत. अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर शिवसेनेचे तारू सत्तेचा किनारा गाठू शकली त्याच समाजाच्या माय बहीनींची छेड काढण्याचे धाडस शिवसेनेला महागात पडेल असा इशारा प्रत्येक मराठा देवू लागलाय. मराठा समाजाच्या या चळवळीत शिवसेना समाजासोबत कधीच नव्हती. ज्या मराठा समाजाची पिढी शिवसेनेसाठी बरबाद झाली त्या समाजातील महिलातरूणींविषयी शिवसेनेच्या मुखपत्राने गरळ ओकली व्यंग प्रवृती दाखवून दिली म्हणूनच सकल समाज उध्दव ठाकरेंना विचारतोय.....
सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात बसणारे ‘हे’ समाजकंटक नक्की कोण? मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक सामान्य व्यक्तीने पक्षनिष्ठ मराठा म्हणून नव्हे तर कर्तव्यनिष्ठ व जबाबदार मराठा म्हणून मराठा क्रांती मोर्चात सहभाग नोंदवला आहे,मग परस्पर मराठा क्रांती मोर्चाचे शिलेदार व त्यांची नावे जाहीर करून सामना स्वतःच स्वतःला निरपराध का घोषित करत आहे?
मराठा क्रांती मोर्चात कुणी नेता व पदाधिकारीच नसतांना असे पांगळे समर्थन सामनाला का करावं लागतंय? व्यंगचित्रांचे समर्थन करून करोडो मराठा व समस्त स्त्रीजातीची बदनामी सामना का करत आहे?
मराठा क्रांती मोर्चाच्या शिलेदारांची नावे टाकताना पक्ष समर्थक सदस्यांची नावे टाकून मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्याचा डाव तर सामना आखत नाही ना? या कृत्याची माफी न मागता समर्थन का केलं जातं आहे? पक्षातील मराठा गृहीत धरला जातोय का? एकीकडे मराठा क्रांती मोर्चाला समर्थन, मराठा आरक्षणाला पाठींब्याचे नाटक, व लागलीच मराठा समाजाची विटंबना,ही दुहेरी भूमिका का? मराठा व सर्वच माता-भगिणींची माफी मागण्याचे सौजन्य व संस्कारही सामना व पक्षात नाहीत का?.
शिवसेनेच्या मुखपत्रातून बहूजनांच्या आई-बहिणींची विटंबना करणार्या शिवसेनेचे हे पुतळा-मावशीचे प्रेम आता उघड झाले आहे. बहूजनांनो यांना आता धडा शिकवाच.
- एक मावळा