तात्यासाहेब बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
बुलडाणा, दि. 12 - रूग्णसेवेबरोबरच अध्यात्मीक क्षेत्रातही वावर असणारे अनुराधा परीवाराचे आधारस्तंभ कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित अनुराधा परीवाराने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनुराधा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय चिखली तर्फे दिनांक 12 सप्टेंंबर 2016 रोज सोमवारला सकाळी 10 ते 3 या वेळेत, मौनीबाबा संस्थान चिखली येथे भव्य नेत्रचिकित्सा शिबीराचे आणी मोफत चष्मे वाटपाचे आयोजन केले आहे.
आजवर लोखोच्या संख्येत नेत्र तपासणी करून चष्म्याचे वाटप केल्या गेले असून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचा वाढदिवस दिनांक 12 सप्टेंबर रोजी भव्य आणी निशुल्क नेत्रचिकित्सा व उचार शिबीर आणी चष्म्ये वाटप याचे आयोजन चिखली येथील परहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान मध्ये सकाळी 10 ते 3 या वेळेत करण्यात आले आहे. तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्याबरोबरच या शिबीरात निवडल्या जाणार्या रूग्णांना 20 ऑक्टोंबर 2016 रोजी चष्म्याचे वाटपही एम्पेथी फाउंडेशन, मुंबई चे सौजन्याने करण्यात येणार आहे. या शिबीरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के व त्यांचे चमु, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार आणी यांचे चमु, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खान व चमु, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूदासाणी व त्यांचे चमु, स्व.चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय चिखली येथील तज्ञ डॉक्टर व चमु, प्रसिध्द नेत्रचिकित्सक डॉ. बाहेकर, डॉ. जोशी, डॉ. संदेश राठोड, डॉ. दिपाली शिंदे, चिखली येथील डॉ. रविंद्र साळवे, डॉ. जोशी, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुटूंबे, फार्मासिस्ट डॉ. डोेके, आदी तज्ञ नेत्रतपासणी करणार आहे. एम्पेथी फाउंडेशन, मुंबई यांचे वतीने मोफत चष्मे देण्यात येणार आहे.
या शिबीराचा रूग्णांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अनुराधा औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास बियाणी यांनी केले आहे.