बस चालकास मारहाण, तिघांना अटक
शिरढोण, दि. 12 - हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बसस्थानकावर एसटी बस आणि मोटारसायकलची किरकोळ धडक झाली. याचा राग मनात धरुन एसटी बसचालकाला मारहाण केली. हा प्रकार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. सचिन सर्जेराव शिंदे असे बसचालकाचे नांव असून याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.
कवठेमहांकाळ आगाराची एसटी बस (एमएच 12 ईएफ 6489) ही कवठेमहांकाळहून सलगरेकडे निघाली होती. हिंगणगाव गावामध्ये बस थांब्यावर थांबल्यावर काही प्रवासी खाली उतरले तर काही बसमध्ये बसले. दरम्यान, बसचालकाने बस सुरु करुन पुढे घेतली व पाठीमागून डाव्या बाजूने ओव्हरटेक करुन बसच्या दरवाजाला मोटारसायकल धडकलीय या बस जाग्यावर थांबवण्यात आली. चालक सर्जेराव शिंदे यास मोटारसायकलवरील तानाजी विठोबा शेजाळ याने खाली उतरविले. मारहाण केली, तर लगेच त्याने दुसरे दोन सूरज तानाजी शेजाळ व उल्हास पांडुरंग वाघमोडे या नातेवाइकांना मोबाईल करुन बोलावून घेतले. यांनी चालकाला मारहाण करीत शिवागीळ केली व कपडे फाडले, असे फिर्याद दिली आहे. तानाजी शेजाळ, सूरज शेजाळ (दोघे रा. हिंगणगाव) व तिसरा आरोपी उल्हास वाघमोडे (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.