ग्रामरोजगारांच्या विविध समस्यांबाबत ग्रामरोजगार सेवक संघटनेचे निवेदन
बुलडाणा, दि. 12 - महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेतील ग्राम रोजगार सेवकांचे मासिक वेतन मिळणेकरीता , पेरणी ते कापणीचे काम रोजगार हमी योजनेत घेणे, यांसह इतर समस्यांकरीता ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने ना.रविकांत तुपकर वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष तसेच धृपतराव सावळे जिल्हाध्यक्ष भाजपा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, ग्राम रोजगार सेवक हे पद शासकिय परिपत्रकानुसार शासनाने निर्माण केले आहे. महाराष्ट्र हे पद निर्माण करणारे प्रथम राज्य होय. महाराष्ट्र पाठोपाठ केंद्र सरकारने हे पद इतर राज्यातही निर्माण केले. आणि आजरोजी त्या ठिकाणी त्यांना कायमस्वरुपी करुन त्यांना रोजगार व मानधन मिळवून दिले आहे. त्यामुळे मजुर कुटूंबाची नोंदणी करणे, जॉब कार्ड तयार करुन वाटप करणे, मजुरांचे पोस्टाचे खाते काढणे, मजुरांचे हजेरीपत्र तयार करणे व प्रत्यक्ष कामावर हजर राहून कामाची देखरेख करणे, ग्रामसेवकांस व ग्राम विकास अधिकारी यांना मदत करणे, सर्व शासकीय रेकॉर्ड अद्ययावर ठेवणे या सर्व प्रकारची कामे ग्रामरोजगार सेवकाकडून केली जातात मात्र त्याचा योग्य मोबदला आम्हाला मिळत नाही. तरी आमच्या रोटीचा प्रश्न मार्गी लावत आमच्या समस्या म.ग्रा.रोहयो मंत्रही ना.जयकुमार रावल यांच्या दरबारी मांडाव्या करीता विनंती निवेदन करीत आहोत.
निवेदनावर विजय मापारी जिल्हाध्यक्ष, दिनकर मोरे अध्यक्ष ग्रामरोजगार सेवक संघटना चिखली, रंगनाथ सावळे सचिव ता.ग्रामरोजगार सेवक संघटना, नागेश घुगे, तुळशीराम मानकर यांच्यासह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.