भोतमांगे दहा वर्षानंतरही न्यायाच्या प्रतिक्षेत ! खैरलांजी हत्याकांड
भंडारा, दि. 29 - मानवतेला काळीमा फासणार्या, संपूर्ण देशभर पडसाद उमटणार्या खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण झाली असली तरी, आरोपींना फाशीची शिक्षा झाली नसल्याची खंत भैय्यालाल भोतमांगे व्यक्त करून, त्यांची न्यायालयीन लढाई दहावर्षानंतरही सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. शेतावर गेले असल्याने कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते. आरोपींना फाशी व्हावी यासाठी अनेक आंदोलने झाली. भोतमांगेना न्याय मिळावा म्हणूण अनेक दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. मात्र दहा वर्षानंतरही अरोपींना फाशीची शिक्षा होवू नये, याबद्ल भोतमांगे तीव्र नाराजी व्यक्त करतात. या हत्याकांडांनंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरु झाला होता. 15 ऑक्टोबर 2008 साली भंडारा सत्र न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी भैयालाल भोतमांगे यांची मागणी आहे.