Breaking News

पाकिस्तानची नाचक्की ! ‘सार्क’ परिषद स्थगित

नवी दिल्ली, दि. 29 - नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमध्ये होणारी 19 वी ‘सार्क’ परिषद स्थगित करण्यात आली आहे. ‘सार्क’ परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या नेपाळने ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक यश मिळाले आहे.
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने ‘सार्क’ परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बांगलादेश, भूतान व अफगाणिस्तान या देशांचाही भारताला पाठिंबा मिळाला. परिणामी ही परिषद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1985 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या गटात भारत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान व पाकिस्तान हे देश सदस्य आहेत. नियमानुसार सर्व सदस्य देशांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र एखाद्या देशाने सहभाग घेतला नाही तर ती बैठक स्थगित करावी लागते किंवा रद्द करावी लागते. स्थापनेनंतर पहिल्यांदाच भारताने परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.