Breaking News

शेअर निर्देशांक वधारला



मुंबई, 14 सप्टेंबर, :  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 18.69 अंकांनी वधारून 28,372.23 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 11 अंकांची वाढ होऊन तो 8,726 वर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांवर आधारित असलेला निर्देशांक सकाळच्या सत्रात 8 अंकांच्या घसरणीसह 28,345वर उघडला. दिवसभरात निर्देशांकाने  28 हजार 416.41चा उच्चांकी आणि 28 हजार 259.38चा नीचांकी स्तर गाठला. 50 समभागांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाच्या सुरूवातीला 5 अंकांच्या घसरणीसह उघडला. दिवसभरात या निर्देशांकाने 8,739.85 ची उच्चांकी आणि 8,688.90ची  नीचांकी पातळी गाठली.
अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, क्सिस बँक, सिप्ला, टाटा मोटर्स, बजाज, लार्सन अँड टूब्रो आदी कंपन्यांच्या समभागात वाढ दिसून आली. एचडीएफसी, पावरग्रीड, विप्रो, टीसीएस, कोल इंडिया आदी कंपन्यांच्या समभागात घसरण दिसून आली.