निराधारांची सेवा हाच खरा धर्म ः आ.बोंद्रे
बुलडाणा, दि. 17 - संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, यांची गरजुंना उतारवयात होणारी मदत जरी छोटी असली तरी वृध्दांना स्वाभिमानाने व कोणावर आश्रीत न राहता जिवन जगता येते, म्हणून वृध्द महिला, अपंग, विधवा, परितक्त्या व निराधारांसाठी ही योजना अतिशय महत्वाची ठरते. या योजने संदर्भात चिखली मतदार संघात मागिल काही दिवसा पासून मदत मागणार्यांची संख्या वाढत असतांना त्यांच्या अडचणीतही वाढ होत होती, म्हणून योग्य ते मार्गदर्शन व्हावे आणी या योजने संदर्भात सर्व कागदपत्राची पूर्तता एकाच छताखाली करून प्रकरण मार्गी लावण्यासाठी भुमीपूत्र ग्रामदरबार ही संकल्पना पुन्हा एकदा राबविण्याचे ठरविले. कारण निराधारांना सेवा देणे हाच आपला खरा धर्म आहे व त्यानुसार आज हा मेळावा संपन्न होत असून याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल असा विश्वास आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.
चिखली पंचायत समितीच्या प्रागणात दिनांक 14 सप्टेंबर 2016 रोजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून अतिशय यशस्वीरीत्या गतकाळात पार पडलेल्या भुमीपूत्र ग्रामदरबार पुन्हा एकदा भरविण्यात आला. या दरबारात वृध्द महिला, विधवा, परितक्त्या,श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांची प्रकरणे मार्गी लागल्याने आयोजकांना आशिर्वाद देत होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी ताकभाते, विस्तार अधिकारी, तहसिलदार विजय लोखंडे, नायबतहसिलदार धनमने, पवार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या बरोबरच कॉगे्रस कमिटीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष विष्णु पाटील, माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, माजी शहर अध्यक्ष प्रदिप पचेरवाल, पंचायत समिती सभापती लक्ष्मण आंभोरे, उपसभापती दयानंद खरात, सौ. सविताताई वाघमारे, सौ. कोकीळाताई परिहार, बिदुसिंग इंगळे, पप्पुसेठ हरलालका, डॉ. इसरार, श्याम वाकदकर, रामभाउ जाधव, समाधान सुपेकर, सुधाभाउ धमक, संजय पांढरे, ईश्वर इंगळे, विजय शेजोळ,विजय गाडेकर, बंडु खरात, नंदु हाडे, राजेंद्र वाघमारे, शेख अजिम, अमीनखॉ उस्मानखॉ, पुरूषोत्तम शेळके, बबन पानझाडे, प्रमोद कुटे, कैलास सुरडकर, संतोष खरात, यांची उपस्थीती होती.
चिखली तालुक्यातील सवणा, वळती हातणी पळसखेड जयंती, किन्होळा, वाडी ब्रम्हपूरी, कोलारी, गिरोला, हातणी, शेलुद, पेठ, सोमठाणा, दिवठाणा, शिंदी हराळी, बोरगांव वसु, उत्रादा, आन्वी, खंडाळा मकरध्वज, शेलगांव जाहागीर, गोदरी, पळसखेड दौलत, भोकर, वाडी, चांधई, मलगी, भानखेड, जांभोरा, माळशेंबा, खोर, वाघापुर, अंत्रीकोळी, या गावांसाठी प्रथम टप्यातील भुमीपूत्र ग्रामदरबाराचे आयोजन करण्यात येवून त्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना यांची मोठया प्रमाणात प्रकरणे मार्गी लावण्यात आली. यासाठी चिखली पंचायत समितीचे प्रागणात वरील सर्व गावांचे सर्व तलाठी व कोतवाल आवर्जुन हजर होते. प्रागणात स्वतंत्ररित्या गावनिहाय व्यवस्था करून येणार्या लाभार्थ्यांना यथोचित मार्गदर्शना बरोबरच कागदपत्राची पुर्तता केल्या जात होती. या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी तहसिलचे कर्मचारी यांचेसह गावोगावचे कॉगे्रस पक्षाचे कार्यकर्ते लोकांना सहकार्य करीत होते.