Breaking News

मराठा मोर्चा दिनी ड्राय-डे घोषीत करा ः खा.जाधव

बुलडाणा, दि. 17 - कोपर्डी प्रकरणाच्या निषेधासह सामाजिक न्यायमागण्यासाठी लाखोच्या संख्येत मराठा समाज बांधवांचा मोर्चा बुलडाण्यात निघणार आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरीकांचा समावेश असणार आहे.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातुन  सप्टेंबरला ड्राय-डे घोषीत करावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
यासंदर्भात खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिले आहे. कोपर्डी येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ 26 सप्टेंबरला बुलडाणा येथे मराठा क्रांती मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी लाखोच्या संख्येने मोर्चेकरी बुलडाण्यात धडकतील. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता अबाधीत राहण्याच्या दृष्टीने मराठा मोर्चा दिनी बुलडाणा जिल्ह्यातील संपुर्ण दारु विक्रीची दुकाने, बिअर बार व हॉटेल्स बंद ठेवण्याबाबत कार्यवाहीची मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.