शेतकर्यांना ज्वारी बियाणाचे वाटप
पारनेर (प्रतिनिधी)। 17 - तालुक्यातील बहिरोबावाडी , किन्ही येथिल शेतकर्यांना बुधवारी कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल देठे पाटील यांच्या हस्ते ज्वारीचे बियाणाचे वाटप करण्यात आले.या वेळी श्री. देठे यांनी कृषी विभागामार्फत मोफत ज्वारीचे बियाणो वाटप करण्यात आल्याबद्दल कृषी विभागाचे आभार मानत ,कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यांनी घेण्याचे आवाहन केले.या प्रसंगी कृषी ा सहाय्यक पी. जी. जाधव यांनी शेतकर्यांना विविध योजनांबद्दल माहिती दिली. या वेळी संतोष खोडदे , संतोष निमसे, सखाराम खोडदे , दादाभाऊ मोढवे , मोहन मोढवे , रामदास देठे , रावसाहेब देठे, यशवंत व्यवहारे , पंढरिनाथ किनकर , रंभा पवार , संपत खोडदे , गुलाब आरेकर , विशाल देठे , किरण व्यवहारे आदी उपस्थित होते.