विद्यार्थ्यांना फुलविताना शिक्षकही फुलतो ः नाना शिवले
पुणे, दि. 29 - शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नसून समाजातील विविध बदलांना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आणि जीवनात येणार्या आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती बहाल करतो. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलविताना शिक्षक स्वत:ही फुलतो, असे मत महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी काढले.
एल्गार सामाजिक साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित एल्गार राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण व गणेश कांगुणे लिखित गीतापर्व : ईश्वराचा शोध या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, एल्गार सामाजिक साहित्य परिषदेचे संस्थापक महेंद्रकुमार गायकवाड, अभिनेता अतुल आगळे, कवी पीतांबर लोहार, कवयित्री रूपाली अवचरे आदी उपस्थित होते.
शिवले म्हणाले, आपल्या अवतीभवती घडणार्या घटना, प्रसंग, प्रेरणा आणि स्वत:च्या अनुभवातून व्यक्त होणारे लेखन अधिक परिणामकारक आणि प्रेरक ठरते.’’ एल्गार राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने व्यंकटेश काटकर (नांदेड), अजय धोटे (अमरावती), जनार्दन देवरे (मनमाड), अनिता मुदकण्णा (उस्मानाबाद), आशा पाटील (सोलापूर), रजनी ताजणे (डहाणू), नीता नहार (डहाणू), हिम्मत ढाळे (अकोला), रेखा पाटील (सांगली), अमोल गोंडचवार (अकोला), संतोष जाधव (जुन्नर), सुभाष सोनवणे (पुणे), प्रा. बाळासाहेब सोनवणे (पुणे), ज. तु. गार्डे (फलटण, जि. सातारा) यांना गौरवण्यात आले.
त्यानंतर दरम्यान, ज्येष्ठ कवी संतोष कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. यात पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह प्रा. विजय लोंढे, राजेंद्र वाघ, सागर काकडे, विजय वडवेवार, अमरजीत गायकवाड, दीपक अमोलिक, हरिदास कोष्टी यांनीही रचना सादर केल्या.
दिगंबर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सीताराम गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. नितीन चंदनशिवे यांनी आभार मानले.