खरीप पिकांचे तात्काळ पंचनामे करा-भास्कर ढाकणे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. 29 - सध्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने जे खरीप पिकांचे तसेच शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. ते शासनाने शेतकर्यांचे जागेवर जाऊन पंचनामे करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परळी वैजनाथ तालुकाध्यक्ष भास्कर ढाकणे यांनी केली आहे. तसेच ऑफीस मध्ये न बसता शेतकर्यांच्या शेतात जावुन पंचनामे करावेत.
परळी तालुक्यातील मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या नुकसानाची शेतकर्यांना तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकर्यांच्या सोयाबीनला कोंब फुटुन ते पिक उगवायला लागले आहे. मागील कांही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे, फळबांगाचे नुकसान, घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त झालेल्यांना तात्काळ करावेत. तालुक्यातील सोयाबीन, मुग, उडीद, मका, आदी पिकांची लागवड झाली सर्वत्र झाली होती या पिंकांची शेतात पाणी घुसून पिकांची नासाडी झाल्याने कापणी अभावी सोयाबीनच्या शेंगा फुटून जागेवर उगवत आहे. शेतकरी राजाचा मतदाना पुरता वापर न करता त्यांच्या नुसानीचे पंचानामे करा. सरसगट मदत करा तोड बघून पंचनामे करुन नका. सरसगट पंचनामे करा. पंचनामे करुन शेतकर्यांना जागेवर मदत करावी अशी ही मागणी श्री. ढकाणे यांनी केली आहे. शेतकरी सद्या अडचीत असुन त्यांना तात्काळ आर्थिक मदत व्हावी. आगोदरच चार वर्षाचा सततचा दुष्काळामुळे आणि आता यावर्षीचा ओल्या दुष्काळ यामुळे शेतकर्यांवर पुन्हा संकट आले आहे. तसेच प्रशासनाने योग्य दखल घेऊन त्यावर त्वरीत पंचनामे करुन शेतकर्यांना मदत मिळेल तशी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर ढाकणे यांनी केली आहे.