Breaking News

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली, दि. 16 -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक काळातील हिटलर आहेत. आता देशातील दलितांनी याचा निर्णय करावा की, त्यांना राज्यघटना हवी की वामनाची पूजा करणारा मनुवाद याची निवड त्यांनी करावी, अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भागवत यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडले.  आंबेडकर यांनी भागवत यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
देशभरातील दलित अत्याचारांच्या विरोधात शुक्रवारी दिल्लीत भारिप बहुजन पक्षाच्या वतीने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित स्वाभिमान संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सीताराम येचुरी, माजी खासदार वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा, सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांची भाषणे झाली.