Breaking News

फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरणार - गौतम गंभीर

नवी दिल्ली, दि. 16 -  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्याच्या मालिकेला कानपूर येथे 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघाने दर्जेदार फिरकीपटूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. ते मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे मालिकेचा फैसला ठरविताना दोन्ही संघातील फिरकीपटूंची कामगिरी निर्णायक ठरणार आहे, असे भाकीत सध्या भारतीय संघातून नसलेल्या गौतम गंभीरने केले आहे.
न्यूझीलंड संघ नेहमीच चिवट संघ म्हणून ओळखला जातो. त्यांना कुणीही फार महत्त्व देत नाही. परंतु, ते प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करतात, असे गंभीर म्हणाला.  त्यांचा संघ संतुलित आहे. मिचेल सँटर, इश सोधी आणि मार्क क्रेग असे तीन चांगले फिरकीपटू त्यांच्याकडे  असल्याने त्यांची बाजू आणखी मजबूत झाली आहे. दोन्ही संघापैकी ज्या संघातील फिरकीपटू चांगली गोलंदाजी करतील, त्यांच्या बाजूने मालिकेचा निकाल झुकेल, असेही तो म्हणाला.