पुण्यात बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पुणे, दि. 29 - एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृह (उद्योग केंद्र) येथील लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून येरवडा पोलिसांनी या मुलास मारहाण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. दरम्यान त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पोलीस कोठडी सुनावलेल्याचे नाव ऋषीकेश हनुमंत गडकर (वय 19, रा. काळेवाडी पेट्रोल पंपासमोर, आळंदी) असे आहे. सुधार गृहातील अधीक्षक शरद कुर्हाडे (वय 34) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अजीज सलीम शेख (वय 18), मोहसीन उर्फ वसीम शाहिद सय्यद (वय 19), अनिकेत अनिल कांबळे (वय 18) यांच्यासह इतर 3 अल्पवयीन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपी व त्यांच्या इतर साथीदारांनी सुधारगृहात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलास 11 ऑगस्ट रोजी रात्री मारहाण करून त्याला तोंडाने घाण साफ करायला लावली. घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा 16 ऑगस्ट रोजी रात्री पीडित मुलास मारहाण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे.
त्याने व त्याच्या साथीदाराने यापूर्वी कोणावर असा अत्याचार केला आहे का, त्याचा दुसरा कोणी साथीदार आहे का, याचा तपास करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.