Breaking News

पवार यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

प इस्लामपूर, दि. 28 -  कोपर्डीतील बलात्कारप्रकरणी दोषींना फाशी द्यावी, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व इस्लामपूूर नगरपरिषदेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी मंगळवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. सायंकाळी  वाजता जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामापत्र सादर केले. सांगली येथे मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. इस्लामपूर पालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पालिकेच्या राजकारणात आनंदराव पवार यांच्या माध्यमातून शिवसेनेने खाते उघडले होते. इस्लामपूर पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे पवार यांच्या राजीनाम्यामुळे पालिकेच्या राजकारणात फरक पडणार नसला तरी, कोपर्डी प्रकरण व मराठा आरक्षणाची मागणी करीत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यापुढे आरक्षणासाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगीतले.