बिहारमध्ये आमदारपुत्राने दुचाकीस्वाराला भोसकले
पाटणा, दि. 18 - बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार वीरेंद्र सिन्हा यांचा मुलगा कुणाल याने किरकोळ वादातून एका दुचाकीस्वाराला भोसकले. पिंटू यादव असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या दुचाकीस्वाराने आमदारपुत्राच्या चारचाकीला ओव्हरटेक केले. त्यानंतर कुणालने पिंटू कुमारला मारहाण केली आणि चाकूने भोसकले. औरंगाबाद जिल्ह्यातील दाऊदनगरजवळच्या भगवान बिगहा येथे ही घटना घडली. पिंटू यादवला पाटण्यातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुणालला अटक केली आहे.
