Breaking News

केंद्रीय मंत्री नड्डा यांच्यावर मध्य प्रदेशमध्ये शाईफेक

भोपाळ, दि. 18 -  मध्य प्रदेशमधील ॠएम्स’ रुग्णालयात संतप्त वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यावर शाई फेकण्यात आली.
श्री. नड्डा यांच्या हस्ते एमआरआय व सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे त्यांच्या कपड्यांवर व गाडीवर त्याचे डाग पडले. श्री. नड्डा कार्यक्रमस्थळी पोहोचताच विद्यार्थ्यांनी विरोध करायला सुरुवात केली होती. एम्सच्या इमारत बांधण्यामध्ये होणारी दिरंगाई व अन्य विविध समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीही केली. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. तेव्हा श्री. नड्डा यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तेथून निघाले. तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या गाडीचा धक्का लागून एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला.