भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
नवी दिल्ली, दि. 30 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून भारताला जशातसे उत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी उर्मट उत्तर दिले. त्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचे कळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीमेवर तणाव वाढत चालला आहे.
आरएसपुरा, अरनिया या दोन सीमा परिसरात पाकिस्तानची अॅक्शन टीम आणि लष्कराच्या हालचाली दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिलेय. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झालेल्या उरीजवळच्या सीमेवरही पाकिस्तानी सैन्याची तुकडी दिसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली करणार हे माहीत असल्याने सीमारेषेवरील सुरक्षा अगोदरच वाढवण्यात आलेय. जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्यात. त्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत. सीमारेषेवरील गावांनाही खाली करण्यात आली आहेत.