दुचाकीस्वारांच्या हल्लयात पुन्हा एका पोलिसांचा मृत्यू
पुणे : राज्यभर पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनेत घालेली वाढ काही केल्या थांबण्याची चिन्हे नसून, पिंपरी परिसरात दुचाकी अंगावर घातल्याने भोसरी एमआयडीसीचे सहायक फौजदार सुरेश चपटे यांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वारांना पकडण्याचा प्रयत्न करताना त्यांच्याकडून चपटेंच्या अंगावर दुचाकी घालण्यात आली होती.पिंपरी परिसरात रविवारी संध्याकाळी तिघे जण दुचाकीवरुन जात असताना एएसआय सुरेश चपटेंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुचाकीस्वारांनी पळून जात एएसआय सुरेश चपटे यांच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. तसंच त्यांच्या डोक्याला आणि नाकालाही मार लागला होता.
जखमी एएसआय यांच्यावर उपचार सुरु होते, पण झालेल्या अपघातातून न सावरलेल्या सुरेश चपटे यांना रात्री दोनदा झटके आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ज्या तिघांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली होती ते फरार झाले आहेत.
