सदाफुलेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
जामखेड (प्रतिनिधी)। 28 - जामखेड शहरातील सदाफुले वस्तीवर असणार्या जिल्हा परिषद शाळा ही अतिशय जूनी असून, या शाळेचे बांधकाम अतिशय कुचकामी झाल्याने या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाने सर्व शाळेमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मुलांना येजा करताना याच पाण्यातून जावे लागते. येत्या 15 दिवसांच्या आत शाळेचे काम झाले नाही, तर सदाफुले वस्तीवरील सर्व नागरिकांच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बिभीषण धनवडे यांनी दिला आहे.
जामखेड शहरातील सदाफुले वस्तीवर जिल्हा परिषद शाळा ही इयत्ता 1 पहिली ते 4 थी पर्यंत आहे. याठिकाणी सर्व गोरगरीब व मजुरी करणार्या नागरिकांचे मुले शाळेत शिक्षण घेत आहेत.या ठिकाणी पावसाच्या पाण्याने सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. आणि संपूर्ण शाळेच्या खोल्या जुन्या असल्याने त्या कधीही पडू शकतात. आणि मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच शाळेच्या पाठीमागे शौचालय बनले आहे. त्यामुळे मुलांना मोठया प्रमाणावर दुर्गंधी येत असून, त्याच्या आरोग्यास व मोठे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेचे शालेय पोषण आहार ज्या ठिकाणी बनवला जातो त्याठिकाणी जामखेड शहरातील मोकाट जनावरे या शाळेतील मुले जेवण करताना ते त्यांच्या ताटामध्ये येऊन खातात. त्यामुळे मुले त्या जनावरांच्या त्रासाला कंटाळून जेवण करत नाही. काही दिवसांपूर्वी शाळेची भिंत पडली होती. ती शाळेतील शिक्षकांनी आपल्या पगारातून बांधली आहे. या सर्व मागण्यांसाठी नगरसेवक बिभीषण धनवडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल यादव यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षता समितीमध्ये सर्व मागण्या मांडल्या होत्या. पंरतु त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे जामखेड शहरातील सदाफुले वस्तीवरील सर्व नागरिकांच्या व शाळेतील मुलांसह व नागरिकांसह जामखेड तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक बिभीषण धनवडे यांनी दिला आहे.