व्यंगचित्रातुन मराठा महिलांची बदनामी
मराठ्यांनी केली दै.सामनाची होळी
बुलडाणा, दि. 28 - महाराष्ट्रभर निघणारे मराठा समाजाचे मुकमोर्चे आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येत असतांना दै.सामना मधुन मराठा महिलांची व्यगचित्रातुन बदनामी केली असा आरोप करीत सकल मराठा तरुणांनी दै.सामनाची स्थानिक जयस्तंभ चौकात होळी केली. तसेच जिल्हाधिकार्यांना या बाबत निवेदन दिले.महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या न्याय हक्का करीता प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात येत आहे. या मराठा मुक मोर्चामध्ये लाखोंच्रूा संख्येने असलेली महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवावर बंद करावा, शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी डॉ.स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू करा यासह अनेक मागण्या या मराठा मुक मोर्चाच्या आहेत. सदर मोर्चा बाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै.सामना या वृत्तपत्रामधुन 26 स्टप्टेबर रोजी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचा हस्सा करीत ‘हसोबा प्रसन्न’ या सदरमध्ये मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे व्यंगचित्र दाखविण्यात आले आहे. या कृत्यामुळे मातृतिर्थ महाराष्ट्रातील तमाम जिजाऊंच्या लेकींचा अपमान करण्यात आला आहे. काढण्यात आलेल्या या व्यंगचित्रातुन दै.सामनाचे निवास प्रभू देसाई यांना काय संदेश द्यायचा आहे हे त्यांनी लवकरात लवकर स्पष्ट करावे सकल मराठा समाजाला सुध्दा या व्यंगचित्राचा अर्थ काय निघतो हे स्पष्ट करुन द्यावे. जोपर्यंत स्पष्टीकरण देणार नाही व सकल मराठा समजाची जाहीर माफी मागणार नाही तो पर्यंत दै.सामना च्या विरोधात आंदोलन सुरुच राहील असे म्हटले आहे.
दरम्यान या घटनेचे पडसाद जिल्हाभरात पडसाद उमटत असून जिल्ह्यातील विविध भागामध्ये गावात, शहरात शिवसेना नगरसेवक, पदाधिकार्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक ठिकाणी शाखाफलकांना काळे फासण्यात आल्याचीही माहिती प्राप्त होत आहे.