भाजपाच्या अच्छे दिन चे दिवास्वप्न जनतेची दिशाभूल-खा.चव्हाण
सोनपेठ /प्रतिनिधी, दि. 12 - राज्य भाजपमुक्त करण्यासाठी सोनपेठ नगरपालिकेपासून सुरुवात करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत.भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडली असुन काँंग्रेसच्या काळात अशा गंभीर घटना घडत नव्हत्या आणि पोलीस प्रशासनावर हल्ला होत नव्हता आता भाजपचे कार्यकर्तेच पोलिसावर हल्ला करत आहेत.तसेच त्यांनी कोपर्डी प्रकरण,उस्मानाबाद पत्रकार हल्ला,ठाणे येथील पोलीसावर हल्ला असे उदाहरणे देऊन सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारने दोन वर्षापुर्वी शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते.त्या अश्वासनाबरोबर महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने केली नाही, मात्र आम्ही शेतकर्यांच्या प्रश्नासाठी लढत कर्जमाफी करण्यासाठी सरकारविरोधात लढा देऊन कर्जमाफी करुन देनारच अशी ग्वाही त्यानी यावेळी देताना मी मुख्यमंत्री असताना शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी दिली होती.आज मोठ्या प्रमाणात शेतकर्यांवर सकंटे येऊनही हे रजाकारी सरकार शेतकर्यांना कर्जमाफी देत नसल्याबाबत टिका केली.तसेच आमच्या कार्यकाळात झालेल्या कामाचा आढावा पाहून जनतेनी यापुढे सोबत रहावे व येणार्या काळात सोनपेठ नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सोनपेठ शहरवासीयांना उद्देशून त्यांनी केले.ते पुढे बोलताना म्हणाले की,काँग्रेस ज्यावेळी सत्तेत होती त्यावेळी काँग्रेसने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले परंतु त्यावेळी मतदारांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत आज जनतेची बुरे दिनावर बोळवण केली असल्याचे दिसुन येते असे म्हणत त्यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना तुम्हाला अच्छे दिन आले का असे विचारत सरकारच्या अच्छे दिन या बीद्रवाक्यावर सडकुन टिका करत अच्छे दिनाची खिल्ली उडवली.यावेळी व्यासपीठावर परभणी जिल्हा प्रभारी माजी मंत्री आ.डी.पी.सावंत,माजी खा.तुकाराम रेंगे,जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर,नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार,जयश्री खोबे, द्वारकाबाई कांबळे,गफार मास्टर, नागसेन भेरजे,सत्तार ईनामदार, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष शिवाजी मव्हाळे,माजी नगराध्यक्ष ता विघमान गटनेटे चंद्रकांत राठोड , उपनगराध्यक्ष डिंगाबर भाडूळे, आदींसह , काँग्रेसच्या नगरसेवकांची उपस्तिी होती,यावेळी या कार्यक्रमात नगराध्यक्ष रामभाऊ चव्हाण,व नगरसेवक राजेभाऊ अंबुरे,दत्ता पांढरे,सह जिलानी कुरेशी, अब्दुल रहेमान सौदागर यांनी आपल्या समर्कांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुत्रसंचालन नगरपालिका निरीक्षक बंडू पांचलिंग यांनी केले.
