मराठा समाजाच्या मोटारसायकल प्रबोधन रँलीचे उत्स्फूर्त स्वागत
अहमदनगर, दि. 18 - नगर येथे होणार्या मराठा क्रांती मुक मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नेवासा तालुक्यात मोटारसायकल प्रबोधन रँली काढण्यात आली या रँलीचे नेवासा शहरात तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले नगर येथे दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या मुकमोर्चास जास्तीत जास्त मराठा समाज बांधव यावेत म्हणून या मोटारसायकल रँलीचे आयोजन शनिवारी दि.17 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.नेवासाफाटा येथून मोटारसायकल रँलीचा शुभारंभ करण्यात आला.
शेकडो युवकांसमवेत या रँलीचे आगमन नेवासा शहरात झाल्यानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी या रँलीचे स्वागत केले व स्व:त या रँलीत सहभागी झाले.ग्रामपंचायत चौकात माजी सरपंच नंदकुमार पाटील,शंकरराव लोखंडे, सतीश गायके,उपसरपंच गोरखभाऊ घुले,राजेंद्रघोरपडे, पत्रकार सुधीर चव्हाण नरसूशेठ लष्करे,अंबादास ईरले,शिवा गवळी,भाजपचे शहराध्यक्ष पोपटराव जीरे,गणेश व्यवहारे,रावसाहेब घुमरे यांनी बाळासाहेब मारकळी, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्वागत केले. सदर रँलीने संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये जाऊन माऊलीच्या पैसखांबाचे दर्शन घेतले नंतर नेवासा बुद्रुक येथे जातांना तहसील कार्यालयाच्या रस्त्यावरच सकल मराठा बांधवांच्या वतीने औसा येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेचा निषेध करणारे निवेदन नायबतहसीलदार प्रदीप पाठक व पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांना देण्यात आले नगर येथे होणार्या मराठा क्रांती महामोर्चाची नेवासा तालुक्यात जय्यत तयारी सुरु असून समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नेवासा तालुक्यातील गाव न गाव पिंजून काढण्यात येणार असून जनजागरण करण्यात येणार असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले.