अरुंद रस्त्यामुळे पारगाव फाट्यावर ट्रक कालव्यात कोसळला
अहमदनगर, दि. 18 - श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाटा दरम्यान, दौंड -नगर रस्त्यावरील विसापूर शाखा कालवा 132 मध्ये पहाटेच्या सुमारास कालव्यावरील अरुंद रस्त्यामुळे कठड्याचा अंदाज न आल्याने मक्याची पोती घेऊन जाणारा मालट्रक कालव्यात कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. (युपी 78 सीएन 4955) (उत्तर प्रदेश) कानपूर मधील हा ट्रक मका घेऊन पहाटेच्या सुमारास नगरहून दौंडकडे जात होता. तो बेलवंडी फाट्याच्यापुढे विसापूर शाखा कालव्यावर असणार्या अरुंद रस्त्याचा ट्रक चालकास अंदाज न आल्यामुळे कालव्यावरील कठडा तोडून कालव्यात ट्रक पलटी झाला. यामध्ये चालकासह अजून दोघेजण होते. परंतु कुणीही जखमी झाले नाही. याबाबत बेलवंडी पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच कुकडीचे कर्मचारी देखील घटनासथळी तळ ठोकून होते. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत कालव्यातून अपघातग्रस्त ट्रक बाहेर काढण्यात न आल्याने घटनासथळी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
