गोर-गरिब आणि वंचितांच्या न्यायासाठीच आक्रोश ः आ.बोंद्रे
बुलडाणा, दि. 18 - सामाजिक आर्थिक जात निहाय जनगणनेच्या नावाखाली समाजातील शोषित आणि वंचितांच्या योजना बंद पाडण्याचा डाव उद्योगपतीधार्जिण्या भाजपा सरकारने आखलेला आहे. हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी गोर-गरिब आणि वंचितांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित आक्रोश मोर्चे या सरकारचे डोके ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.
गोर-गरिबांच्या आणि वंचितांच्या व्यक्तीगत लाभांच्या योजना एका मागोमाग बंद करण्याचा सरकारने सुरू केलेला धडाका लक्षात घेता तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला संबोधीत करतांना आ. राहुल बोंद्रे बोलत होते. यावेळी सर्वश्री. आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस व्दय शाम उमाळकर, संजय राठोड, जेष्ठ नेते मुखत्यारसिंग राजपूत, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मीनल आंबेकर, सरचिटणीस जयश्री शेळके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष समाधान हेलोडे, जिल्हा परिषदेचे सभापती अंकुशराव वाघ, गणेश बस्सी, माजी अध्यक्ष बाळाभाऊ भोंडे, माजी सभापती दिलीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य अनिल खाकरे, मोताळा पंचायत समितीचे सभापती मिलींद जैस्वाल, सरचिटणीस दिपक रिंढे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल तायडे, माजी अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम देवकर, शहराध्यक्ष अॅड. शरद राखोंडे, नगर परिषद उपाध्यक्ष विनोद बेंडवाल, कृ.बाजार समितीचे माजी सभापती संजयजी पांढरे, माजी नगराध्यक्ष उज्वला काळवाघे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस गजनफर खान, बुलडाणा जिल्हा काँग्रेस मिडीया सेल अध्यक्ष श्लोकानंद डांगे, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र आणि राज्यशासनाच्या विरोधात जिल्हा काँग्रेसने बंड पुकारले आहे. शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज 17 सप्टेंबर रोजी बुलडाण्यात मोर्चाच्या माध्यमातून सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे व आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.
पुढे बोलतांना आ. राहुल बोंद्रे यांनी भाजपा सरकार विरोधात काँग्रेसने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी उभारलेला हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे यावेळी सांगितले. केवळ मोठ्या शहरातील नागरिकांसाठी आणि उद्योगपतींसाठीच हे सरकार योजना आणि विकासकामे करीत आहेत. त्याउलट सर्वसामान्य जनतेला वार्यावर सोडण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. बुलेट ट्रेन, जलदगती महामार्ग, व्हायफाय यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात परंतु शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी या शासनाकडे पैसे नाहीत. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाविरोधात लढा अधिक तिव्र करण्याची गरज असल्याचेही आ. राहुल बोंद्रे यांनी सांगितले.
मोर्चाच्या अनुषंगाने बोलतांना आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील व राज्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नसून शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचा या सरकारचा बेत असल्याचा आरोप केला. तसेच उद्योगपतींना मोठ्या प्रमाणावर सोई-सवलती देतांनाच समाजातील तळागाळातील घटकावर मात्र अन्याय केल्या जात आहे. या सरकारच्या विरूध्दचा हा असंतोष आक्रोश म्हणुन व्यक्त होत आहे. आणि या आक्रोशाच्या माध्यमातून ही जनता आगामी काळात या प्रतिगामी पक्षास त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलतांना आ. सपकाळ म्हणाले की, काँग्रेस शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरु केलेल्या सर्व कल्याणकारी योजना बंद करुन भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. घरकुल योजनेच्या जुन्या प्रतिक्षा याद्या रद्द करुन नव्याने बनविलेल्या याद्यांमध्ये धनधाडंगे, मृतक आणि गाव सोडून गेलेल्यांची नावे समाविष्ठ करुन खर्या लाभार्थ्यांना डावलण्याचे काम या सरकारने केले आहे. घरकुल, राशनकार्ड, आरोग्य विषयक योजना यासह इतर बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला, शहरातील अतिक्रमण हटाव मोहीमेत दुजाभाव झाला असून अतिक्रमणधारकांच्या न्यायहक्कासाठी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वसामान्य जनता आणि अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सातत्याने पाठपुरावा करु व लढा देत राहू असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक गांधी भवन येथे पार पडलेल्या या सभेत प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, संजय राठोड, विनोद बेंडवाल, भागवत वनारे व धाडचे सरपंच रिजवान सौदागर यांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन माजी शहराध्यक्ष सुनील सपकाळ यांनी केले. या सभेनंतर मोर्चाला सुरुवात झाली. बुलडाणा शहराच्या प्रमुख मार्गांवारून साडेतीन ते चार हजार मोर्चेकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कुच केली. मोर्चात सहभागी असलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रचंड घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी घेवंदे यांनी स्विकारले.