‘एक पर्व ओबीसी सर्व’ मेळाव्याची नियोजन बैठक संपन्न
अहमदनगर, दि. 28 - अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी समुहातील कार्यकर्त्यांची बैठक नंदनवन मंगल कार्यालयात संपन्न झाली. बैठकीमध्ये ओबीसी वरती अन्याय होऊ नये त्याच प्रमाणे मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी. त्याच प्रमाणे समाजातील होणारे अतिक्रमण व अत्याचार या विषयावर सामाजिक विषयावर चर्चा करून 3 ऑक्टोबरच्या नाशिक येथील मोर्चा संदर्भात नियोजन करण्यात आले. मोर्चामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख ओबीसी बांधव नाशिक येथील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. बैठकीस युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता. सुमारे 4 हजार कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. कार्यक्रमाला कोणीही अध्यक्ष अथवा संयोजक नव्हते. उत्स्फूर्तपणे ‘एक पर्व ओबीसी सर्व’ या एका घोषणेवर बैठक संपन्न झाली.
यावेळी 274 जातीतील प्रतिनिधी उपस्थित होते. अंबादास गारूडकर, अशोक सोनवणे, संजय गारूडकर, नामदेव पवार, राजेश सटाणकर, हरिभाऊ डोळसे, कुलथे, वाघमारे, कर्जचे नराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय लोंढे, अविनाश मेहर, खामकर, प्रा. गाडेकर सर आदी उपस्थित होते.