बुलडाण्यातील खासदारांसह आमदारांचे राजीनामे!
शिवसेनेच्या मुखपत्रात मराठ्यांचे बदनामीकारक व्यंगचित्र...
बुलडाणा, दि. 28 - शिवसेनेच्या मुखपत्रात ‘हसर्या रेशा’ या व्यंग सदरमध्ये ‘मुका मोर्चा’ म्हणून व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. संपुर्ण राज्यभर मराठ्यांचे मुक मोर्चे निघत आहे. कोपर्डी अत्याचाराचा निषेध तसेच मराठा समाजाला आरक्षण अशा ज्वलंत विषयावर निघणारे हे मोर्चे लाखाच्या घरात आहे. हे मोर्चे म्हणजे मराठा समाजाच्या भावनांचा ‘मुक’ उद्रेक असल्याचे स्पष्ट होत आहे.मात्र या मुक मोर्चांना डिवचणारे व्यंग चित्र शिवसेनेच्या वृत्तपत्रात प्रकाशित करुन त्यावर ‘मुका मोर्चा’ असे लिहल्याने मराठा समाजाच्या भावना अधिकच संतत्प झाल्या आहेत. पक्षाच्या या मुखपत्रात मराठा समजाच्या भावना दुखाविणारे व्यंगचित्र प्रकाशित केल्याबदल मराठा संघटनांकडून ठिकठिकाणी निषेध सुरु आहे. तसेच राज्यभरातील शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुुरु आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि खासदार प्रतापराव जाधव हे सुध्दा राजीनामा घेवू मुंबईला पोहोचले असून त्यांच्यासोबत मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आणि सिंदखेड राजाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर सुध्दा राजीनामा तयार ठेवून आहे. राजीनामा घेवून ‘मातोश्री’वर पोहोचलेल्या खासदार आणि दोन्ही आमदारांच्या बाबतीत सोशल मिडीयावर वृत्त झाळकताच ‘व्हॉट्स अॅप’ वरील अनेक गृपमध्ये सुध्दा खळबळ उडाली आहे. याबाबत लोकमंथनच्या प्रतिनिधींनी खा.प्रतापराव जाधव, तसेच जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे भ्रमनध्वनी बंद असल्याचे आढळून आले. वृत्त लिहेपर्यंत प्रसिध्दी प्रमुख यांना फोन लावले असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.