Breaking News

राज ठाकरेंचा पुतळा जाळणार्‍यावर गुन्हे दाखल करा

दे.राजा (प्रतिनिधी), दि. 17 - मुंबई येथे विदर्भ वाद्यांच्या पत्रकार परिषदेत वाद झाल्यावर राज्य भरात वेगवेगळ्या ठिकाणी पडसाद उमटले. त्यामधेच देऊळगांवमही येथे राज ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यानंतर मात्र मनसे ही आकृतक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख यांनी दे.राजा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे.
चौकात एैन गणपतीच्या वेळी बेकायदेशीर रित्या जमावबदी करून. राज ठाकरे यांचा पुतळा जाळला व जमावबंदीचे आदेशाला न जुमानता जमाव करून तणाव निर्माण केले व पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुतळा जाळुन आमच्या भावणा दुखावल्या गेल्या असे आपल्या तक्रारीत बाळराजे यांनी नमुद केले आहे. तरी या सर्व संबधीतांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी असेही तक्रार कर्ता यांणी आपल्या तक्रारीत लिहीले केले आहे. ठाणेदार राजपुत यांना मणसे च्या वतीने ही तक्रार देण्यात आली.
     यावेळी रामेश्‍वर माने, शेख कदीर, युवकराज वाघ, संदिप कायंदे, शेख शहेजाद, रामेश्‍वर जाधव, रंगनाथ मगर यांच्यासह  इतर कार्यकर्ते उपस्थित होते.