Breaking News

शेतकरी समृध्द व्हावा हा प्रदर्शनी मागचा खरा हेतू ः आ.राहूल बोेंद्रे

बुलडाणा, दि. 28 - कृषी प्रदर्शनामध्ये सादर नवनविन तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी सुधारीत बियाणे व शेती उत्पादनावर प्रक्रीया यासंदर्भात मिळणारे ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष शेतीत राबतांना शेती करून शेतकर्‍यांची स्थिती उंचावणे हाच खरा या सलाम बळीराजा कृषी प्रदर्शनी पाठीमागचा खरा उद्देश आहे. आम्ही सातत्यपुर्ण या प्रदर्शनचे आयोजन आजवर करीत आलो आहोत व त्याचा फायदाही प्रत्यक्षात दिसुन येतो आहे ही याची उपलब्धी असे उद्गार सलाम बळीराजा या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार तथा जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काढले. आज दिनांक 27 सप्टेंबर 2016 रोजी बुलडाणा जिल्हयाचे नेते व कॉग्रेस कमिटीचे महासचिव मुकूलजी वासनिक यांच्या वाढदिवसा निमित्त चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा फळबाग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सलाम बळीराजा या कृषी प्रदर्शनच्या अध्यक्ष स्थावरून ते बोलत होते.
याप्रसंगी रिसोडचे आमदार मा.अमित झनक, बुलडाणा मतदार संधाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार बाबुराव पाटील, प्रदेश सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर, जि.प.अध्यक्ष अलकाताई खंदारे, युवक कॉगे्रसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, मुक्त्यारसिंग राजपुत, महिला प्रदेश सरचिटणीस डॉ.तब्बसुम हुसेन, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष हसनराव देशमुख, बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील, पंचायत समिीचे सभापती लक्ष्मण आंभोरे, उपसभापती दयानंद खरात, वसिम कुरेशी, सुधाभाउ धमक, ता.कॉ.माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, समाधान सुपेकर, संजय पांढरे, जगन्नाथ पाटील, कैलास खंदारे, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, सौ. विद्याताई देशमाने, प्रमिलाताई जाधव, नंदुभाउ शिंदे, नंदुभाउ सवडतकर, जिप सदस्य अशोकराव पडघान, शिवनारायण म्हस्के, सर्व बाजर समिती संचालक, पं.स.सदस्य, नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणा पुढे बोलतांना आमदार राहुलभाउ बोंद्रे म्हणाले की, नैसगीक संकटाचा सामाना करीत मोठया मेहतीने आपले शेती उत्पादन पिकविणारे शेतकर्‍यांच्या जिवनात भरभराट यावी, जगात सुरू असलेेले शेती क्षेत्रातील नवनविन संशोधन त्याचे पर्यंत पोचावे, शेेतकर्‍याला इतरांना सलाम करण्याचे नव्हे, तर इतरांनी शेतकर्‍यांना सलाम करावा, असे दिवस येण्यासाठी सलाम बळीराजाचे आयोजन आहे. याचा फायदा घेवून अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतात नवनविन प्रयोग करीत आपले जिवनमान उंचावले आहे. त्यामुळे सलाम बळीराजा या कृषी प्रदर्शनीत आयोजित करतांना जरी जिल्हयाचे नेते मुकूलजी वासनिक त्यांचा वाढदिवस साजरा करीत असलो तरी या माध्यमातून शेतकर्‍यांना उभारी देण्याचे काम आजवर होत आले आहे. असे त्यांनी सांगितले.