नागरीकांच्या समयसुचकतेमुळे रोहीला मिळाले जिवनदान
बुलडाणा (प्रतिनिधी), दि. 28 - आज सकाळी शहरातील काही नागरीक राजुर घाटाकडे फिरायला गेले असता त्यांना एक वन्यप्राणी गंभीर अवस्थेत आढळून आले. यावेळी ‘जगा आणि जगू द्या’ या म्हणीचा प्रत्यय देत आणि पृथ्वीतलावावरील इतर प्राण्यांकरीताही आपले काही कर्तव्य आहे याचे भान ठेवत उपस्थितांनी सदर वन्यप्राण्याचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दि. 27 सप्टेबर रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान शहरातील मिलींद चिंचोळकर, सुरेश कावळे, अनिरुध्द माकोने, प्रशांत सोनोने आदि नागरीक राजुर घटाकडे फिरायला (मॉर्नींग वॉक) गेले. जात असतांना मलकापूर रोडवर असलेल्या बुध्दविहाराच्या परिसरात एक रोही अत्यंत गंभीर अवस्थेत एका नालीत वेदनेने विव्हळतांना त्यांना दिसला. त्यांच्या अंगाला ठिकठिकाणी जखमा झालेल्या त्यांना आढळल्या तसेच त्याचे दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे उपस्थितांनी तत्काळ समयसुचकता दाखवत बुलडाणा आरएफओ झोले यांना फोन करुन याबाबत माहिती पुरविली. वनअधिकारी झोले यांनी प्रकरणाची स्थिती ओळखत ताबडतोब वायाळ, गवारगुरु, कांबळे, देवा वाघ यांचे एक वन दल घटनास्थळी रवाना केले. रोहीची स्थिती पाहता त्याला उठनेही शक्य नव्हते. त्यामुळे घटनास्थळी डॉ.सोनोने यांना बोलावण्यात आले त्यांनी सदर रोहीला बेशुध्द करण्याचे इंजेक्शन दिली. तद्नंतर वनअधिकारी व उपस्थित नागरीकांच्या मदतीने रोहीला एका वाहनामध्ये नेवून वरवंड फाट्याजवळील वन विभागाच्या कार्यालयात सोडण्यात आले.
दरम्यान सदर रोही एवढ्या गंभीर प्रमाणात कसा जखमी झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. तरी काल बुलडाण्यात झालेल्या मोर्चेकर्यांच्या परतीच्या वाहनाने धडक दिल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. तरी आजही बुलडाणा शहरातील नागरीक वन्यप्राण्यांबाबत देखील किती संवेदनशील आहे हे यावरुन दिसून येते.