Breaking News

रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा लेमेलसन पुरस्कार

नाशिक/मुंबई, दि. 17 -  अमेरिकेत कार्यरत असलेल्या आणि मूळच्या नाशिकच्या प्रा. डॉ. रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 3 कोटी 35 लाख रुपये, अशी पारितोषकाची रक्कम असते. डॉ. रमेश रासकर यांच्या संशोधनाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्राध्यापक डॉ. रमेश रासकर हे भारतीय नाव सध्या जगाच्या चर्चेचा विषय बनलं आहे. मूळच्या नाशिकच्या आणि सध्या अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापक असलेल्या या माणसाने असे काही शोध लावलेत, जे थक्क करुन सोडतात.