Breaking News

नाटवडेत अपघातात एक ठार

प कोकरुड, दि. 28 - नाटवडे (ता. शिराळा) येथे दुपारी मिनी टेम्पो झाडावर आदळून एक ठार तर अन्य तीन जखमी झाले. याबाबत कोकरुड पोलिसांत नोंद झाली आहे. शेंडगेवाडीकडून चांदोलीकडे जाणारा मिनी टेम्पो (एमएच 11 बीएल 6243) नाठवडे येथे चालकाचा ताबा सुटल्याने झाडावर आदळला. यामध्ये चालकाशेजारी बसलेले भरत संपत जाधव (रा. पलूस, वय 46) हे जागीच ठार झाले. अन्य तीन जखमी झाले. जखमींमध्ये अनिल आनंदा माळी (वय 39, रा. पलूस), कुंदन हणमंत सुतार (वय 39, रा. पलूस) व भिकू सर्जेराव जाधव (वय 48, रा. ताकारी) यांचा समावेश आहे.