Breaking News

विविध समस्यांबाबत समाजवादी पार्टीच्या वतीने आंदोलनाचा इशारा

बुलडाणा, दि. 18  - येथील स्थानिक समस्यांबाबत शहर अध्यक्ष अजमत खान यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले असून शुक्रवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लीम समाजाचे कब्रस्तान मधिल टिनशेड दुरूस्त करणे, संजय नगर मधिल हिंदु स्मशान भुमीच्या दुरूस्तीचा निधी आलेला असून त्वरीत दुरूस्ती करणे, शहरामध्ये बुध्दविहारासाठी जागा उपलब्ध करुन बांधकाम करुन देण्यात यावे, सध्या शहराला आमना नदीतुन पाणी पुरवठा होत आहे. परंतू शिंगणे नगर मधील आऊटलेट पाणी हे आमना नदीपात्रात येत असल्याने हा पाणी पुरवठा बंद करुन पर्यायी व्यवस्था लावणे आदिंसह इतर समस्यां निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.
दहा दिवसात यावर योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही समाजवादी पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.