डोक्यावर हात हातात दात शिबीरास प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी) । दि. 18 - पी. एम मुनोत ट्रस्ट व अलायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आधार, अहमदनगर जिल्हा कृष्ठरोग निवारण निवारण समिती , कुष्ठधाम रोड ,सावेडी येथील ‘डोक्यावर हात हातात दात ’ या मोफत दंत तपासणी व दात काढण्याच्या शिबिराचे उद्घाटन डॉ. सरोज जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले , डॉ. सिद्धार्थ जोशी ,अलायन्स क्लबचे प्रवीण मुनोत, सुशील जैन , पी. एम मुनोत ट्रस्टचे शरद मुनोत, शरद क्यादर ,प्रदीप बार्शीकर,गिरीश अग्रवाल , दिलीप मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
‘डोक्यावर हात हातात दात ’या विषयी डॉ. सरोज जोशी यांनी सांगितले की, दात काढण्याची हि सर्वात जुनी प्राचीन पद्धत आहे, पारंपारिक आयुर्वेदिक व योगिक क्रियांचा मेळ घालून भूल न देता जालिंदर बंध योग क्रियाचा वापर करून अत्यंत सहजपणे त्रास न होता किडलेले, तुटलेले दात व दाढी काढल्या जातात.भूल इंजेक्शन न देता दात कसे काढले जातात याचीच उत्सुकता सर्वाना असते . वृद्धाना व लहान मुलांना या पद्धतीने दात काढल्याचा जास्त फायदा होतो . मधुमेह व हृदय विकार रुग्णाचे हि दात या पद्धतीने काढले जातात , मात्र त्यांनी त्यांच्या या आजारची पूर्व कल्पना दिली पाहिजे.तसेच जे रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेतात त्यांनी तीन दिवस गोळ्या बंद करणे गरजेचे आहे.
पी. एम मुनोत ट्रस्टचे वतीने शरद मुनोत यांच्या हस्ते डॉ. सरोज जोशी व ,डॉ. डॉ. सिद्धार्थ जोशी यांचा प्रवीण मुनोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास पी. एम मुनोत ट्रस्टचे व अलायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर शिबीर रविवार दि. 18 रोजी कुष्ठधाम येथे सकाळी 9 ते 2 पर्यंत होणार आहे,अधिक माहिती साठी 9422221247 व 9405274304 या क्रमांकावर संपर्क साधावा.