पाणी प्रवाह वळविल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत
पाथर्डी (प्रतिनिधी)। 29 - तालुक्यातील मोहरी पाझर तलावाच्या चारीतील पाणी आपल्या गावाच्या शिवारात यावे यासाठी विविध गावाच्या शेतकर्यांनी पोकलेन या यंत्राच्या सहाय्याने मातीचा बांध घालून पाण्याचा प्रवाह वळवला.त्यामुळे हंडाळवाडी गावावर दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने संतप्त शेतकर्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष सुरु झाला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तेथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष हंडाळ म्हणाले,वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून ही गांभीर्याने दखल घेतली जात नाही.राजकीय दबावामुळे अधिकारी दखल घेत नसतील तर न्यायालयात दाद मागावी लागेल.हंडाळवाडी शिवारातील शेत जमिनींना परिसरातील खोराड नदी एकमेव पाण्याचा श्रोत आहे.यामध्ये मोहरी पाझर तलावातील सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी येते.सांडव्याद्वारे येणारे पाणी लघुपाट बंधारे विभागाच्या अधिकार्यांनी व माळेगांव, वाळुंज येथील अज्ञात लोकांनी पोकलेन मशीनच्या साहाय्याने हंडाळवाडी कडील नदीकडे जाणारा प्रवाह बांध घालून अडवला.पाण्याचा प्रवाह अन्य दिशेने वळविला.या प्रकरणाची चौकशी होऊन हंडाळवाडी शिवारातील चारी पूर्ववत जोडण्यात यावी.बेकायदेशीर काम केल्याप्रकरणी पोकलेन चालका विरुद्ध कारवाई करण्यात यावी.या प्रकाराबाबत तहसील दारांचे लक्ष वेधले असता त्यांनी पहाणी करून लघुपाट बंधारे विभागाच्या अधिकार्यांना कारवाई करण्याचे पत्र दिले.याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास अवघ्या सहा महिन्यांनंतर हंडाळवाडी गावातील शेतकर्यांना स्थलांतर करावे लागेल.जमिनी धरणासाठी देऊनही शेतकर्यांना फायदा होण्याऐवजी अन्य गावांचे लोकांकडून पाणी पळविण्यासाठीचे प्रयत्न होत असतील तर प्रशासनाकडून वेळीच प्रतिबंध व्हावा. शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी तीव्र स्वरूपाचा लढा उभारावा लागेल.पालिका हद्दीमुळे शासकीय सवलती गावाला मिळत नाहीत,आता अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्यापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे.पालकमंत्री राम शिंदे यांचेही या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनावर गावातील एकसष्ट लोकांच्या सह्या आहेत.पाझर तलावातून बाहेर पडणार्या पाण्यावरून प्रथमच वाद उत्पन्न झाले असून प्रशासनाने दखल न घेतल्यास पोकलेन मशीन आम्हाला नवीन नाही,असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
अज्ञात लोकांनी सांडव्याची भिंत फोडून चर खोदून तलावातील पाणी काढून दिल्याने तालुक्यात कोठेही पाऊस नसताना वाळुंज व परिसरातील नदीतून स्वच्छ,नितळ पाणी वाहत आहे.असाच प्रकार चालू राहिला तर महिन्याभरात धरण मोकळे होणार आहे.या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी यासाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळा ने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे लक्ष वेधले आहे.