Breaking News

लोहसर पॅटर्न जिल्ह्यात राबविणार-ए लक्ष्मी

करंजी (प्रतिनिधी)। 29 - लोहसर ता.पाथर्डी येथे मोठ्या प्रमाणात लोकसहभागातुन वृक्षलागवड करण्यात आली असुन वनीकरणातुन गावाचा विकास ही संकल्पना संपुर्ण जिल्हयात राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हावन अधिकारी ए.लक्ष्मी यांनी लोहसर येथे केले.लोहसर ग्रामपंचायत आणी ग्रामस्थांनी लावलेल्या वृक्षकामाची पाहणी लक्ष्मी यांनी केली यावेळी लोहसरचे सरपंच अनिल गिते पाटील,तिसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय व डॉ.गोरख गिते उपस्थीत होते.
    यावेळी बोलताना लक्ष्मी म्हणाल्या वनीकरणातुन गावाचा विकासही संकल्पना लोहसर गावचे सरपंच अनिल गिते यांनी वनसंरक्षण आणी लोकसहभाग या माध्यमातुन लोहसर गावात राबवुन जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.चाराविक्री मध्येही लोहसर गावाने 55 हजार रुपयांचा महसुल मिळवला आहे.येथील वृक्षलागवड आणी संवर्धन चांगले असुन ग्रामस्थांचा लोकसहभाग निश्‍चितच महत्वाचा आहे.वनविभागाच्या
विविध योजना लोहसर गावात राबवनार असुन येथील वृक्षांचे संगोपन करण्यासाठी वनतळे लोहसर परिसरामध्ये उभारणार असुन त्यामध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. संत तुकाराम वनग्राम पुरस्कारासाठीफाइल तयार करण्याच्या सुचना लक्ष्मी यांनी यावेळी संबंधीतांना दिल्या.
अनिल गिते म्हणाले गावामध्ये विविध उपक्रम राबविले जात असुन वृक्षतोड,चराइबंदी,बोअरवेलबंदी,कु-हाडबंदी,यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंवधन झाले त्यामुळे जमीनीतील पाणी पातळीही वाढली असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने ग्रामस्थांनी लोकसहभागातुन सुमारे पंचवीस हजार झाडांची लागवड केली आहे.गावामध्ये लावलेल्या झाडांना ग्रामपंचायत ठिबकद्वारे पाणी पुरवठा करत असुन वनीकरणाचे महत्व गावाला समजले असुन वनिकरणातुन गावाचा विकास ही संकल्पना ग्रामस्थांच्या सहकार्याने यापुढेही राबविणार असल्याचे सांगीतले.