खामगांव-नांदुरा महामार्गावर भिषण अपघात; 1 ठार 5 जखमी
खामगांव (प्रतिनिधी) दि. 29 - नागपूर-धुळे बस खामगांव बस स्थानकावरुन पुढे धुळ्याकडे जात असतांना बसचा खामगांव-नांदुरा महार्गावर भिषण हनुमान नजीक भिषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य 5 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार नागपुर-धुळे ही बस क्र. एम.एच 40-6217 खामगांव बस स्थानकातुन पुढील प्रवासाकरीता धुळे कडे निघाली होती. दरम्यान नांदुरानजीक हनुमान मंदिराजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात असणार्या ट्रक क्र.एम.एच 18-एए 9318 व ट्रक क्र. एमएच 04 सीजी 5852 ने एस टी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालक अबरार खान रा.मुंबई हा जागीच ठार झाला तर दुसरा ट्रक चालक नारायण नागमोडे रा.धुळे हे गंभीर जखमी झाले आहे. सदर अपघातात ट्रकचा पुर्णपणे चुराडा होवून या तिहेरी अपघातातील ट्रक चालक, ट्रक मध्ये अडकले होते. त्यांना काढण्यासाठी उपस्थितांनी धाव घेतली. एस.टी मधील जखमींना काढून तत्काळ खामगांव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर अपघातातील प्रवाशांमध्ये स्वामी चैतन्यगिरी महाराज रा.जुनागांव बुलडाणा, देविदास शिंदे रा.शिवाजी नगर मलकापुर, कैलास जगन्नाथ धनोकार रा.बेलुरा ता नांदुरा व ज्ञानेश्वर विश्वनाथ वाघ रा.भेंडवळ ता.जळगांव जामोद आदि प्रवासी जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.