मराठवाड्यात पुन्हा जोरदार पाऊस
लातूर, दि. 01 - मराठवाड्याचा दुष्काळ धुवून लावल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उस्मानाबादसह लातूर शहर आणि परिसराला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या पावसाचा पिकांना मोठा फटका बसणार आहे.लातूरच्या अहमदपूर तालुक्यात जोरात पाऊस झाल्याने लिंबोटी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसंच मानार नदीकाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदेडमध्ये पावसाने रात्रभर जोरदार बॅटिंग केल्यानंतर सकाळी उघड घेतली आहे.
