पोलिस कॉन्स्टेबलचा कुर्हाडीने हात धडावेगळा
औरंगाबादमधील धक्कादायक घटना
औरंगाबाद, दि. 01 - पोलिस कॉन्स्टेबलवर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला करून, त्या कॉन्स्टेबलचा हात धडावेगळा करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. हात तोडलेल्या कॉन्स्टेबलचे नाव प्रकाश बामणे असे असून, ते औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात कार्यरत आहेत. चुलत भावांनी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बमणे यांचा हात तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रकाश बमणे कामावरुन परतत असताना औरंगाबादच्या हर्सुल नाका येथे त्यांना नातेवाईकांनी गाठलं. नातेवाईकांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कुर्हाडीने वार केले. यामध्ये त्यांचा एक हात धडावेगळा करण्यात आला.प्रकाश बमणेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिस का गप्प आहेत, हा प्रश्नही सर्वांना पडला आहे.
