बीड जिल्हयामध्ये जोरदार पाऊस
बीड, दि. 15 - बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी पुन्हा एकदा शेतकरीवर्ग चिंतातूर ठरला होता, मात्र परतीचा पाऊसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नदी आणि ओढ्यातून पाणी वाहू लागले असून सलग 48 तासापासून बीडकरांना सूर्यदर्शनही झालेले नाही. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस असा अनुभव सध्या लोक घेत आहेत. मोठ्या पतिक्षेनंतर पाऊस होत असल्याने शेतकर्यांनाही दिलासा मिळणार आहे.